मे १६
दिनांक
मे १६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १३६ वा किंवा लीप वर्षात १३७ वा दिवस असतो.
<< | मे २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनतेरावे शतक
संपादन- १२०४ - बाल्डविन नववा पहिला लॅटिन सम्राट झाला.
सोळावे शतक
संपादन- १५२७ - फ्लोरेन्सच्या जनतेने मेदिची घराण्याची राजवट उलथवली व प्रजासत्ताक राजवट लागू केली.
- १५६८ - मेरी स्टुअर्ट पळून इंग्लंडला आली.
सतरावे शतक
संपादनअठरावे शतक
संपादन- १७७० - १४ वर्षाच्या मेरी आंत्वानेत व १५ वर्षाच्या लुई ऑगुस्तेचेलग्न.
एकोणिसावे शतक
संपादन- १८३६ - २७ वर्षाच्या एडगर ऍलन पोने त्याच्या १३ वर्षाच्या चुलत बहिणीशी लग्न केले.
- १८६८ - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॅक्सन महाभियोग खटल्यात १ मताने निर्दोष ठरला.
- १८७४ - मॅसेच्युसेट्समध्ये पूर. १३९ ठार.
विसावे शतक
संपादन- १९१८ - अमेरिकेत सरकारवर टीका करणे हा तुरुंगवासास पात्र गुन्हा ठरवण्यात आला.
- १९२० - पोप बेनेडिक्ट पंधराव्याने जोन ऑफ आर्कला संत ठरवले.
- १९२९ - पहिले ऑस्कार पुरस्कार वितरीत.
- १९३८ - अटलांटा येथे एका हॉटेलमध्ये आग. ३५ ठार.
- १९४८ - चैम वाइझमान इस्रायेलच्या पंतप्रधानपदी.
- १९६६ - चीनी कम्युनिस्ट पक्षाने सांस्कृतिक क्रांतीला सुरुवात केली.
- १९६९ - सोवियेत संघाचे अंतराळयान व्हेनेरा ५ शुक्रावर उतरले.
- १९७५ - सिक्कीममधील जनतेने कौल दिल्यावर भारताने सिक्कीमला देशाचा भाग करून घेतले.
- १९७५ - जुन्को ताबेई एव्हरेस्टवर चढणारी प्रथम स्त्री ठरली.
- १९९२ - स्पेस शटल एन्डेव्हरची प्रथम अंतराळयात्रा सफल.
- १९९६ - अटलबिहारी वाजपेयी भारताच्या पंतप्रधानपदी
एकविसावे शतक
संपादन- २००३ - कॅसा ब्लांकात अतिरेक्यांचा हल्ला. ३३ नागरिक ठार. १०० जखमी.
- २००५ - कुवैतमध्ये स्त्रीयांना प्रथमच मतदानाचा हक्क.
- २००६ - न्यू झीलंडजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.४ तीव्रतेचा भूकंप.
जन्म
संपादन- १६११ - पोप इनोसंट अकरावा.
- १९२६ - माणिक वर्मा, शास्त्रीय व सुगम संगीत गायिका.
- १९३१ - के. नटवर सिंग, भारतीय परराष्ट्र मंत्री.
- १९७० - गॅब्रियेला सॅबाटिनी, आर्जेन्टिनाची टेनिस खेळाडू.
- १९७५ - निरोशन बंदरतिलके, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- १९२६ - महमद सहावा, शेवटचा ओस्मानी सम्राट.
- १९५० - अण्णासाहेब लठ्ठे, कोल्हापूर संस्थानचे दिवाण; अर्थमंत्री, महाराष्ट्र.
- १९९४ - माधव मनोहर, लेखक, समीक्षक.
- २००० - माधव गोविंद काटकर, मराठी कवी.
प्रतिवार्षिक पालन
संपादन- शिक्षक दिन - मलेशिया.
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर मे १६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)