Location via proxy:   [ UP ]  
[Report a bug]   [Manage cookies]                
Jump to content

अवतार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अवतार ही एक हिंदू धर्मातील कल्पना आहे. तिच्यानुसार एरवी स्वर्गात राहणारे देव पृथ्वीवर एकतर अर्ध-देव रूपात येतात किंवा मनुष्यरूपात जन्म घेतात.

डार्विनचा उत्क्रांतिवाद : विष्णूचे दहा अवतार आणि डार्विनचा उत्क्रांतिवाद यांमधले साधर्म्य अचंबा करण्यासारखे आहे. पूर्णपणे सुधारलेला माणूस उत्क्रांत होण्याआधी जलचर प्राणी, उभयचर प्राणी, हिंस्र प्राणी व रानटी माणूस हे पृथ्वीवर आले. विष्णूचे अवतार तसेच आहेत. स्त्रीच्या गर्भाशयात वाढणारे मूलही अशाच अवस्थांमधून जाते. डार्विनच्या समकालीन असलेल्या अर्न्स्ट हेकल (१८३४-१९१९) या प्राणिशास्त्रज्ञाने 'ओंटोजेनी रीकॅपिच्युलेट्स फायलोजेनी' नावाचा सिद्धान्त प्रस्तुत केला होता. त्या सिद्धान्तानुसार मादीच्या गर्भात असलेला भ्रूण उत्क्रांतिवादात सांगितलेल्या पायऱ्या-पायऱ्यांनी वाढतो. हा सिद्धान्त मांडण्यासाठी अर्न्स्टने अनेक जीवांच्या गर्भावस्थेतील छायाचित्रे सादर केली होती. दुर्दैवाने काहीतरी गफलत होऊन कुत्रा, कोंबडा व माणूस यांच्या गर्भावस्था दाखवताना एकच चित्र तीनदा छापले गेले. या सिद्धान्ताचा शोधनिबंध वाचताना या चुका टीकाकारांच्या लक्षात आल्या, आणि सिद्धान्तावर 'चुकीचा सिद्धान्त' असा शिक्का बसला. अशा प्रकारे एक महान वैज्ञानिक सार्वत्रिक लोकसन्मानाला अपात्र ठरला. अर्न्स्ट हेकलने तयार केलेले इकाॅलाॅजी, फायलोजेनी हे शब्द मात्र भाषेत प्रचलित झाले. अर्न्स्टने 'प्रोटिस्टा' नावाचा एक सजीवांचा गटही शोधला होता.

भागवत पुराणात वैकल्पिक यादी देखील देण्यात आली आहे, ज्यात त्या अध्याय १.३ मध्ये २२ विष्णू अवतारांची संख्यात्मक यादी केली आहे.

  1. सनकादि[][भागवत पु.१.३.६] -ब्रह्मदेवाचे चार मानस पुत्र आणि भक्ती मार्गाचे उदाहरण दिले[]
  2. वराह [भागवत पु.१.३.७] - विष्णूच्या दशावतारांपैकी तिसरा अवतार []हिरण्याक्ष राक्षसाचा वध करणारा
  3. नारद [भागवत पु.१.३.८] -नारद मुनी हे ब्रह्म देवांच्या सात मानस पुत्रांपैकी एक. नारद मुनी हे भगवान विष्णू यांच्या परमप्रिय भक्तांपैकी एक मानले जातात. []
  4. नर-नारायण [भागवत पु.१.३.९] - हिंदू जुळे संत आहे. नर-नारायण हे पृथ्वीवरील विष्णूचे जुळ्या अवतार आहेत.[]
  5. कपिल [भागवत पु.१.३.१०] -महाभारतात कर्दम ऋषि आणि देवहूति यांचा मुलगा.[]
  6. दत्तात्रेय [भागवत पु.१.३.११] - विष्णू, ब्रह्माशिव यांचे अवतार मानले जातात.अत्रि ऋषी व पत्नी अनसूया यांचा पुत्र.[]
  7. यज्ञ (सुयज्ञ) [भागवत पु.१.३.१२] -अग्नी-यज्ञाचा स्वामी जो वैदिक इंद्र - स्वर्गाचा स्वामी देखील होता.[]
  8. ऋषभदेव [भागवत पु.१.३.१३] -भरत चक्रवर्तीन आणि बाहुबली यांचे पिता.[]
  9. पृथु [भागवत पु.१.३.१४] - राजा पृथू हा राजा वेन यांचा मुलगा होता.[]
  10. मत्स्य [भागवत पु.१.३.१५] -विष्णूच्या दशावतारांपैकी पहिला अवतार.हिंदू पौराणिक कथानुसार प्रलयच्या वेळी मनुला वाचवले आणि हयाग्रीवा असुर या नावाचा राक्षसाचा वध करणारा.[][]
  11. कूर्म [भागवत पु.१.३.१६] - श्रीविष्णूच्या दशावतारांपैकी दुसरा अवतार,हिंदू पौराणिक कथानुसार समुद्रमंथनाचावेळी .मंदारचल पर्वताला सागराच्या तळाशी आधार दिला.
  12. धन्वंतरी [भागवत पु.१.३.१७] - पौराणिक कथानुसार देव-दानव सागरमंथन करत होते तेव्हा चौदा रत्न निघाले. त्यांपैकी एक म्हणजे विष्णु अवतार देव धन्व॔तरी होय. आयुर्वेदिक औषधाचे जनक आणि देवाचे चिकित्सक.
  13. मोहिनी [भागवत पु.१.३.१७] -हिंदू पौराणिक कथानुसार समुद्रमंथनाचावेळी विष्णूने धारण केलेले अवतार.
  14. नरसिंह [भागवत पु.१.३.१८] - पौराणिक कथानुसार विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार,हिरण्यकशिपु राक्षसाचा वध करणारा मनुष्य-सिंह.[]
  15. वामन [भागवत पु.१.३.१९] - विष्णूच्या दशावतारांपैकी पाचवा अवतार .महर्षी कश्यप आणि अदिती यांचा पुत्र
  16. परशुराम [भागवत पु.१.३.२०] - भगवान विष्णूंचा सहावा अवतार .कार्तवीर्य अर्जुनाचा(सहस्रार्जुन ) वध करणारा.
  17. वेदव्यास [भागवत पु.१.३.२१] - पराशर ऋषींचे पुत्र महर्षी वेदव्यास (पाराशर व्यास ) यांनी महाभारत या महाकाव्याची रचना केली. []
  18. राम [भागवत पु.१.३.२२] - वाल्मीकिंनी रचलेल्या ’रामायण’ या महाकाव्याचे नायक आहेत. श्रीराम हे विष्णूच्या दशावतारांपैकी सातवा अवतार.
  19. बलराम [भागवत पु.१.३.२३] - श्रीकृष्णाचा मोठा भाऊ आहे.अनंत शेष नागाचा अवतार[]
  20. कृष्ण [भागवत पु.१.३.२३] - विष्णूचा आठवा अवतार मानला जातो. देवकी आणि वसुदेवाचा पुत्र.
  21. बुद्ध [भागवत पु.१.३.२४] -हिंदू अनुयायी गौतम बुद्धांना विष्णूचा नववा अवतार असे मानतात[१०]
  22. कल्की [भागवत पु.१.३.२६] -हिंदू पौराणिक देवता विष्णूचा दहावा अवतार आहे. कलियुगाकलि राक्षसाचा विनाश करेल.

हयग्रीव, हंस आणि गरुड सारख्या अवतारांचा उल्लेखही पंचरात्रमध्ये एकूण एकोणतीस अवतार आहे. तथापि, या याद्या असूनही, साधारणतः विष्णूसाठी स्वीकारलेल्या दहा अवतारांची संख्या १० व्या शतकापूर्वी निश्चित केली गेली होती.[]

विष्णुदेवाचे दहा अवतार (हे सर्व प्राणिरूपात, अर्ध-मानवी रूपात, अप्रगल्भ मानवीरूपात किंवा पूर्ण मनुष्यरूपात आहेत).

[संपादन]
  1. मत्स्य (मासा) : मत्स्य जयंती ही चैत्र शुक्ल तृतीयला असते. (या अवतारादरम्यान विष्णूने ब्रह्मदेवाकडून वेद पळवून समुद्रात लपलेल्या राक्षसाला मारले.)
  2. कूर्म (कासव) : कूर्म जयंती ही वैशाख पौर्णिमेला असते. याच दिवशी गौतम बुद्ध जयंती असते
  3. वराह (डुक्कर) : वराह जयंती ही भाद्रपद शुक्ल तृतीयेला असते. (या अवतारात विष्णूने हिरण्याक्ष राक्षसाचा वध केला.)
  4. नरसिंह (अर्धा-मनुष्य, अर्धा प्राणी) : नृसिंह जयंती वैशाख शुक्ल चतुर्दशीला असते.
  5. वामन (अपूर्ण मानव) : भाद्रपद शुक्ल द्वादशी (वामन द्वादशी) या दिवशी वामन जयंती असते.
  6. परशुराम (अप्रगल्भ मनुष्य) : परशुराम जयंती ही वैशाख शुक्ल तृतीया (अक्षय्य तृतीया) या दिवशी असते.
  7. राम (पूर्ण मनुष्य): रामाचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला झाला. त्या दिवसाला रामनवमी म्हणतात.
  8. कृष्ण (पुरापुरा मनुष्य) : कृष्णजयंती ही जन्माष्टमीला (श्रावण वद्य अष्टमीला) असते.
  9. बुद्ध (प्रबुद्ध मनुष्य) : बुद्ध जयंती - वैशाख पौर्णिमा (बुद्ध पौर्णिमा). याच दिवशी कूर्म जयंती असते.
  10. कल्की (?) : श्रावण महिन्यातल्या शुक्ल पंचमीला कल्कीचा जन्म होईल.

अन्य अवतार

[संपादन]
  1. बलराम (अनंत शेषनागाचा अवतार) : भाद्रपद कृष्ण षष्ठी (हल षष्ठी) या दिवशी बलराम जयंती असते.
  2. यज्ञ :
  3. व्यास : व्यास पौर्णिमेला- आ़षाढ पौर्णिमेला, व्यास जयंती असते. या दिवसाला गुरुपौर्णिमादेखील म्हणतात.
  4. हयग्रीव (अर्धा माणूस अर्धा प्राणी) : हयग्रीव जयंती ही श्रावण पौर्णिमेला असते. बहुधा त्याच दिवशी राखी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा असते.
  5. नवगुंजर :

विष्णूचे मनुष्यरूपात न आलेले अवतार

[संपादन]
  1. विठ्ठल, (पांडुरंग)

देवाचे मनुष्यरूपातील अवतार

[संपादन]
  1. मेहेरबाबा
  2. सत्य साईबाबा
  3. महावतार बाबाजी

शंकराचे अवतार (हे पूर्ण देव, अर्ध-देव किंवा ऋषी आहेत)

[संपादन]
  1. केदारेश्वर (पूर्ण देव)
  2. खंडोबा (क्षुद्रदेव) मल्लारिमार्तंड
  3. जमदग्नी (ऋषी)
  4. काळभैरव (तांत्रिक देवता )
  5. रुद्र (वैदिक देवता)
  6. हनुमान (क्षुद्रदेव)
  7. शरभ हा अंशतः सिंह व अंशतः पक्षी अशा रूपातला एक काल्पनिक प्राणी आहे. संस्कृत साहित्यातल्या शरभाला हरणाचे आठ पाय असतात. त्याव्यात प्राण्यांचे शरीराचे भाग असून मनुष्याचे अर्धे शरीर असते.[११]

भैरवाची रूपे

[संपादन]

अभिरूप भैरव, अहंकार भैरव, आनंद भैरव, उन्मत्त भैरव, कल्पान्त भैरव, कालभैरव, क्रोध भैरव, चंडभैरव, प्रचंड भैरव, बटुक भैरव, भैरव, महाभैरव, मार्तंड भैरव, रुरुभैरव, संहारक भैरव, सिद्ध भैरव वगैरे.

शंकराचे गण

[संपादन]
  1. टुंडी
  2. नन्दिक
  3. नन्दिकेश्वर
  4. भृंगी
  5. रिटी
  6. वेताळ (आग्यावेताळ, ज्वालावेताळ, प्रलयवेताळ, भूतनाथ)
  7. शृंगी

शंकराचा सेनापती

[संपादन]
  1. वीरभद्र

ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांचे एकत्रित अवतार

[संपादन]
  1. ज्योतिबा
  2. दत्तात्रेय

दत्तात्रेयाचे अवतार

[संपादन]
  1. श्रीवासुदेवानंद सरस्वती (टेंबेस्वामी)
  2. श्रीपाद वल्लभ
  3. श्रीनृसिंहसरस्वती
  4. स्वामी समर्थ (अक्कलकोठ स्वामी)
  5. माणिक प्रभू

ज्योतिबाचे अवतार

[संपादन]
  1. केदारलिंग
  2. बद्रिकेदार
  3. रवळनाथ
  4. रामलिंग


लक्ष्मीचे अवतार

[संपादन]

श्रीदेवी आणि भूदेवी हे लक्ष्मी देवीचे दोन भिन्न अवतार आहेत. रामाची पत्नी सीता; राजकुमार सिद्धार्थाची (गौतम बुद्ध) पत्नी राजकुमारी यशोधरा , कल्की अवतार ची पत्नी पद्मा , कृष्णाची पत्नी रुक्मिणी आणि परशुरामाची पत्नी म्हणून धरिणी हे सर्व लक्ष्मीचे पूर्ण अवतार मानले जाते. दुसरीकडे,कृष्णाची राधा आणि अष्टभार्यापैकी सत्यभामा या लक्ष्मीचे अंश मानल्या जातात.[]

पार्वतीचे अवतार

[संपादन]
  1. काली
  2. गौरी (हरतालिका)
  3. जगदंबा
  4. भवानी
  5. रेणुका
  6. योगेश्वरी (जोगेश्वरी)

पार्वतीचे नवरात्रातील नऊ अवतार

[संपादन]
  1. कात्यायनी
  2. कालरात्री
  3. कूष्मांडा
  4. चंद्रघंटा
  5. ब्रम्हचारिणी
  6. महागौरी
  7. शैलपुत्री
  8. स्कंदमाता
  9. सिद्धिदात्री

पहा : देवांची वाहने, देवांची आयुधे, देवांनी पाळलेले प्राणी

संदर्भ यादी

[संपादन]
  1. ^ a b c d e f g h i j "Avatar". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-12-06.
  2. ^ "सनकादि ऋषि". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2019-07-19.
  3. ^ "वराह अवतार". विकिपीडिया. 2019-09-22.
  4. ^ "नारद मुनी". विकिपीडिया. 2019-08-22.
  5. ^ "Nara-Narayana". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-12-17.
  6. ^ "पृथु". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2018-02-03.
  7. ^ "जानिये किस दैत्य ने की थी वेदों की चोरी ?". bhaktidarshan.in (इंग्रजी भाषेत). 2020-01-26 रोजी पाहिले.
  8. ^ "पाराशर व्यास". विकिपीडिया. 2019-12-13.
  9. ^ "10 Interesting Facts about Balarama - The God of Agriculture". VedicFeed (इंग्रजी भाषेत). 2020-01-26 रोजी पाहिले.
  10. ^ "हिंदू धर्मामधील गौतम बुद्ध". विकिपीडिया. 2018-05-13.
  11. ^ "Sharabha". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-01-25.