चेंबूर
चेंबूर हे मुंबईच्या पूर्व भागातील एक उपनगर आहे. चेंबूर ह्या नावाची उत्पत्ती चिंबोरीपासून झाल्याचे समजते ज्याचा अर्थ मोठे खेकडे असा होतो.
इतिहास
[संपादन]चेंबूर हा १९५० च्या दशकातील जून्या इमारतींसोबत अनेक जूनी गावे जसे की घाटला, गावठाण, वाडवली, माहूल, गव्हाणपाडा, आंबापाडा (आंबाडा) इ. मिळून होतो. पुनर्प्राप्तीपूर्वी (समुद्रात भराव टाकण्यापूर्वी) चेंबूर हे ट्रॉम्बे बेटाच्या वायव्येस होते. असे सूचविले जाते की चेंबूर ही तेच ठिकाण आहे ज्याचा उल्लेख अरब लेखक 'सैमुर' (९१५-११३७), कॉसमॉस इंडिकोप्लस्टस् ने सिबोर (५३५), कान्हेरी गुफेच्या शिलालेखात चेमुला (३००-५००), एरिथेरियन समुद्राचा बाह्यभाग ह्या पुस्तकात सिमुल्ला (२४७), टॉलेमीने सिमुल्ला किंवा टिमुल्ला (१५०) आणि प्लिनीने पेरिमुला (७७ इ.स.पू.) असा केलेला आढळतो. हे मात्र विवादित आहे. महाराष्ट्रातील कुंडलिका नदीवर वसलेले चेवुलचा संदर्भही चेंबूरशी जोडला जातो.
१८२७साली दि बॉम्बे प्रेसिडेन्सी गोल्फ क्लबची स्थापना करण्यात आली, व नंतर आंतरराष्ट्रीय मानके पूर्ण करण्यासाठी पुन्हा तयार केले गेले. १९०६ मध्ये कचऱ्याच्या रेल्वेसाठी कुर्ला-चेंबूर एकल रेल्वे लाईन तयार होईपर्यंत कोणतीही मोठी कामे झाली नाहीत. १९२४मध्ये रेल्वे लाईन प्रवासी वाहतूकीसाठी खुली करण्यात आली.१९२० च्या दशकातील बांधकामानंतर १९३० च्या दशकात चेंबूर शेवटी खुले करण्यात आले. १९४५मध्ये बॉम्बे (मुंबई)मध्ये समाविष्ट करण्यात आला.
स्वातंत्र्यानंतर, चेंबूर हे एक स्थळ होते जिथे फाळणीनंतर निर्वासितांच्या वस्तीसाठी छावण्या बांधण्यात आल्या. दुसऱ्या महायुद्धात व त्यानंतर व ट्रॉम्बेच्या औद्योगिकीकरणमुळे घरांची वाढती मागणी आणि त्यानंतर चेंबूरची वाढ झाली.
१९५५ ते १९५८ च्या काळात स्टेशन कॉलनी (सुभाष नगर), शेल कॉलनी (सहकार नगर) आणि टाऊनशिप नगर (टिळक नगर) येथील बॉम्बे हाऊसिंग बोर्डाच्या बांधकामांमुळे हा परिसर औद्योगिक वसाहतीतून रहिवाशी वसाहत म्हणून हलविण्यात आला.
प्रशासन
[संपादन]भूगोल
[संपादन]दळणवळण
[संपादन]चेंबूर व घाटकोपर यांना जोडणाऱ्या माहुल -घाटकोपर रस्त्याला दिवंगत रामकृष्ण हरिश्चंद्र चेंबूरकर ह्यांच्या स्मरणार्थ रामकृष्ण चेंबूरकर मार्ग असे नाव दिलेले आहे.[१]
आर्थिक स्थिती
[संपादन]करमणूक
[संपादन]पर्यावरणीय समस्या
[संपादन]हे सुद्धा पहा
[संपादन]- ^ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, मंगळवार दिनांक ३ सप्टेंबर २०२४