Location via proxy:   [ UP ]  
[Report a bug]   [Manage cookies]                
Jump to content

तानाजी मालुसरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नरवीर.तानाजी काळोजी मालुसरे

तानाजी मालुसरे यांचा अर्ध-पुतळा
टोपणनाव: तान्हाजी
जन्म: इ.स. १६२६
गोडवली, सातारा , महाराष्ट्र, भारत
मृत्यू: ४ फेब्रुवारी १६७०
सिंहगड, पुणे, महाराष्ट्र, भारत
वडील: काळोजी मालुसरे
आई: पार्वती मालुसरे
पत्नी: सावित्री मालुसरे


तानाजी मालुसरे (१६२६, गोडवली, सातारा - ४ फेब्रुवारी १६७० सिंहगड किल्ला) हे शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एक सुभेदार व शिवाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडी होते.[] तानाजीने महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेपासूनच अनेक महत्त्वाच्या घडामोडीत सहभाग घेतला होता..[] नरवीर तानाजी मालुसरे यांचे एक स्मारक रायगड मधील महाड तालुक्यामध्ये असणाऱ्या आंबेशिवथर गावामध्ये सर्व ग्रामस्थांच्या तसेच भारतीय लष्करामध्ये कार्यरत असणाऱ्या सैनिकांनी व गावातील शहरात असणाऱ्या नोकरदार वर्गाने पुढाकार घेऊन आपल्या वैयक्तिक निधीतून उभे करण्यात आले आहे. हे स्थान महाड पासून 30 किलोमीटर अंतरावर निसर्ग स्थानिद्यात आहे.[ संदर्भ हवा ]

बालपण

[संपादन]

सातारा जिल्ह्यातील गोडवली गावात त्यांचे बालपण गेले. लहान पणापासूनच डोंगरदऱ्यांची माहिती असलेला हा तरुण. वडिलांच्या मृत्यूनंतर ते उंबरठ म्हणजेच त्यांचा शेलारमामा यांच्या गावी गेले.[ संदर्भ हवा ]

कामगिरी

[संपादन]

अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना प्रत्येकी हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी ह्या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती.[ संदर्भ हवा ]

नरवीर तानाजी मालुसरेंची एक अपरिचित लढाई

[संपादन]

तानाजींचा मृतदेह किल्ल्यावरून ज्या मार्गाने कोकणात नेला त्या मार्गाला मढे घाट म्हणतात. स्वराज्यातील रायगडाच्या बाजूला, कोकण पट्ट्यात असणाऱ्या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजींवर सोपविली होती. त्यासाठीच या भागातील उमरठ या गावात येऊन ते राहिले होते. आपलेपणाने वागून ह्या भागातील लोकांना स्वराज्याच्या कार्यात त्यांनी सहभागी करून घेतले.[ संदर्भ हवा ]

कोंढाण्याची लढाई

[संपादन]

सिंहगडची लढाई फेब्रुवारी १६७० रोजी सिंहगड किल्ल्यावर (त्या काळात कोंधना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोंढिन्या)रात्री दरम्यान झाली. मराठा साम्राज्याचा सेनापती तानाजी मालुसरे आणि सिंहगडचा राजपूत किल्लेदार उदयभानसिंग राठोड यांच्यात लढाई झाली. वेढा घेण्याच्या वेळी तानाजीने यशवंती नावाच्या घोरपडच्या मदतीने किल्ल्याकडे जाणाऱ्या एका उंच खडकावर पॊचला.

गडावर चढताना मराठ्यांना पहारेकऱ्यांनी रोखले होते आणि यावेळी पहारेकरी व काही घुसखोर यांच्यात लढाई झाली. उदयभान आणि तानाजी एकाच युद्धात गुंतले. उदयभानने तानाजीची ढाल फोडली आणि त्याची भरपाई केली. त्याने त्याच्या शेजारीच आपल्या पगडीचे कपड लपेटले आणि लढाई सुरूच ठेवली, लवकरच थोड्यावेळ उदयभानने त्याचा कवच तोडले. पण तानाजीने त्याचा सामना केला, ते दोघे युद्धामध्ये मारले गेले. दुसऱ्या मार्गावरून किल्ल्यावर प्रवेश केल्यावर मराठा सैन्याने किल्ला ताब्यात घेतला.[]

तानाजीची स्मारके

[संपादन]
  • तानाजी मालुसरेच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोंढाणा गडाचे नाव बदलून सिंहगड ठेवण्यात आले.
  • पुणे शहरातील वाकडेवाडी या भागाचे नाव बदलून ते नरवीर तानाजी वाडी असे करण्यात आले.
  • पुण्याजवळील सिहंगडावर नरवीर तानाजी मालुसरेचे स्मारक असून, त्याचा अर्धपुतळा त्या ठिकाणी आहे.
  • रायगड जिल्ह्यातील उमरठ या गावीही त्यांचा पुतळा व स्मारक उभारण्यात आले आहे.
  • कवलापूर (ता. मिरज जि. सांगली) या गावात नरवीर तानाजी मालुसरे यांचा पूर्णाकृती पुतळा आहे.

पुस्तक संदर्भ

[संपादन]

पुरस्कार

[संपादन]

तानाजीच्या नावे छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानपीठ इंटरनेशनल संस्थेचा वीर तानाजी मालुसरे राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो.[ संदर्भ हवा ]

चित्रपट

[संपादन]
  • तान्हाजी : द अनसंग वाॅरिअर (हिंदी चित्रपट, सन २०२०, तानाजीच्या भूमिकेत अजय देवगण).[]
  • 'सुभेदार' हा मराठी चित्रपट सुद्धा सुप्रसिद्ध झाला!
  • यापूर्वी १९५२ साली राम गबाले यांनी दिग्दर्शित केलेला 'नरवीर तानाजी' हा मराठी चित्रपट निघाला होता. चित्रपटात दुर्गा खोटे आणि मास्टर विठ्ठल यांच्या भूमिका होत्या.[ संदर्भ हवा ]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "जानिए कौन थे तानाजी मालुसरे, जिन्होंने सिंहगढ़ किले पर की फतह". Amar Ujala (हिंदी भाषेत). 2021-02-04 रोजी पाहिले.
  2. ^ Sharma, Himanshu (2019-11-05). Veer Tanhaji Malusare (इंग्रजी भाषेत). Diamond Pocket Books Pvt Ltd. ISBN 978-93-5296-955-5.
  3. ^ "Explained: Who was Tanaji Malusare, the 'Unsung Warrior' Ajay Devgn is playing". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2020-01-13. 2021-02-04 रोजी पाहिले.
  4. ^ "'Playing Tanhaji Was A Dream And An Honour,' Says Ajay Devgn". Outlook India (इंग्रजी भाषेत). 2023-01-10. 2023-07-12 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]