पित्ताशय
Appearance
पित्ताशय (इंग्लिश: Gallbladder (गॉलब्लॅडर), cholecyst (कोलिसिस्ट) ;) हा पृष्ठवंशी प्राण्यांच्या उदरपोकळीतला, अन्नाच्या पचनास मदत करणारा महत्त्वाचा अवयव आहे. यकृताने निर्मिलेले पित्तरस यात साठवले जाते.
आकार
[संपादन]याचा आकार नासपतीच्या फळासारखा असतो. हे यकृतास व खालच्या बाजूस लहान आतड्याला जोडलेले असते.
कार्ये
[संपादन]यकृतातील पित्तरसाचे पाण्याचा अंश कमी करून स्निग्धांशाच्या पचना योग्य बनवने व खालच्या बाजूस लहान आतड्याला गरजेनुसार पुरवणे.
पित्ताशयाचे आजार
[संपादन]- पित्ताशयातील खडे- पित्ताशयाच्या पिशवीसारख्या भागात पित्तरसातील पाणी कमी केले जाते, त्यावेळी काही रसायनांचे खडे तयार होतात. हे कॉलेस्टेरॉल किंवा बिलिरुबिन व कॅल्शियमचे खडे तयार होतात.
- पित्ताशयाला सुज- पित्ताशयाला जंतुसंसर्गामुळे सुज येते.
- पित्ताशयातील पॉलीप
उपचार
[संपादन]पित्ताशयात खडे झाल्यास आणि त्यामुळे पित्ताशायाच्या नलिकेत अवरोध उत्पन्न होऊन कावीळ निर्माण झाल्यास शस्त्रक्रिया करून पित्ताशय काशून टाकावे लागते. कुठलीही शस्त्रक्रियाना करता आपोआप पित्ताशयातील खडे निघून जाऊ शकतात.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- मानवी उदरपोकळी व पित्ताशय यांच्या आकृत्या (इंग्लिश मजकूर)