Location via proxy:   [ UP ]  
[Report a bug]   [Manage cookies]                
Jump to content

भांडवल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नव-अभिजात अर्थशास्त्रानुसार भांडवल (इंग्लिश: Capital ;) हे स्थावर भांडवल (म्हणजे जमीन, नैसर्गिक संसाधने इत्यादी), श्रम या अन्य दोन उत्पादनसाधनांसोबत उपभोग्य उत्पादने व सेवा निर्मिण्याचे एक उत्पादनसाधन आहे. बहुतेककरून या प्रक्रियेत भांडवल उपभोगले जात नाही (मात्र ते घटू शकते), तर त्यातून निर्मित उत्पादन किंवा सेवा उपभोक्त्या ग्राहकाला विकण्याजोगी असते.

भांडवल म्हणजे संपत्तीचा  असा भाग की जो उत्पादन प्रक्रियेसाठी वापरला जातो, उदा. कच्चा  माल ,मशिनरी,उपकरणांसाठी लागणारे भांडवल

अर्थव्यवस्थेत भांडवला संदर्भात खालील संकल्पना वापरल्या  जातात

१) अधिकृत भांडवल

२) विक्रीस काढलेले भांडवल

३) भरणा भांडवल

४) प्रदत्त भांडवल

भाग भांडवल

[संपादन]

कुठलेही व्यापारी प्रतिष्ठान , कंपनी उभारण्यासाठी आर्थिक भांडवल आवश्यक असते. आधुनिक काळात अनेक लोक एकत्र येऊन भांडवल गोळा करतात आणि उद्योग सुरू करतात. प्रत्येकाच्या हिस्स्याला भाग भांडवल असे म्हणले जाते. व्यावहारिक सोयीसाठी ठराविक किंमतिचा एक भाग असतो . प्रत्येक भागधारक आपल्याकडे असणाऱ्या आर्थिक उपलब्धतेनुसार भाग विकत घेतो.प्रत्येक भागधारक हा उद्योगाचा मालक असतो. मालकीचे प्रमाण मात्र त्याच्याकडे असणाऱ्या भागांच्या संख्येवर ठरते. मिळणारा फायदा सर्व भागधारकांमध्ये , भागांच्या मालकीच्या प्रमाणात वाटला जातो.

हे सुद्धा पहा

[संपादन]