Location via proxy:   [ UP ]  
[Report a bug]   [Manage cookies]                
Jump to content

महान कुरुश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महान कुरुशाच्या राजवटीत हखामनी साम्राज्याच्या विस्तारलेल्या सीमा दाखवणारा नकाशा : पश्चिमेस तुर्कस्तान, इस्राएल, जॉर्जियाअरबस्तानापासून पूर्वेकडे कझाकस्तान किर्गिझस्तान, पाकिस्तानातील सिंधू नदीचे खोरे व ओमानापर्यंतचा प्रदेश.

दुसरा कुरुश ऊर्फ महान कुरुश (अन्य नावे: सायरस द ग्रेट ; जुनी फारसी: 𐎤𐎢𐎽𐎢𐏁 , कुरुश, आधुनिक फारसी: کوروش بزرگ , कुरोश-ए-बोजोर्ग ;) (अंदाजे इ.स.पू. ६०० किंवा इ.स.पू. ५७६ - इ.स.पू. ५३०) हा वर्तमान इराण व नजीकच्या भूप्रदेशांवर हखामनी साम्राज्य स्थापणारा सम्राट होता. कुरुशाच्या राजवटीत हखामनी राज्याच्या सीमा पश्चिमेस भूमध्य सागरी परिसरातील वर्तमान तुर्कस्तानापासून पूर्वेकडे सिंधू नदीच्या खोऱ्यापर्यंत विस्तारल्या. जुन्या जगात तोवर उभे राहिलेले ते सर्वांत मोठे साम्राज्य होते.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • "इराण चेंबर सोसायटीचे अधिकृत संकेतस्थळ - महान कुरुशाविषयी माहिती" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  • "पर्शियन डीएनए.कॉम - महान कुरुश" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)