Location via proxy:   [ UP ]  
[Report a bug]   [Manage cookies]                
Jump to content

यदु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

यदु हा हिंदू पौराणिक साहित्यात वर्णिलेला वंशकर्ता राजा होता. तो राजा ययाति व त्याची पत्नी देवयानी यांचा थोरला पुत्र होता. विष्णू, भागवतगरुड पुराणांनुसार यदूस चार पुत्र झाले, तर पौराणिक साहित्यात अन्यत्र त्यास पाच पुत्र असल्याचे उल्लेख आहेत. क्रोष्टु, सहस्रजित्, नल, अंतिक व लघु अशी त्याच्या पुत्रांची नावे आढळतात. याच्यापासून सुरू झालेल्या वंशाला यादव कुळ किंवा यदुवंश असे उल्लेखले जाते. ]]कृष्ण]] हा यदुवंशात जन्मला.

यदूचे पूर्वज

[संपादन]

ब्रह्मा - दक्ष - विवस्वत - मनु - चंद्र - पुरूरवा - आयु -. नहुष - ययाति - (यदु). हे यदूचे क्रमशः पूर्वज होत. (यादीत फक्त ज्येष्ठ पुत्राचे नाव आहे)

श्रीकृष्णाचे पूर्वज

[संपादन]

यदु - क्रोष्टु - वृज्जीवंत - स्वाही - स्वती - रसदु - चित्ररथ - शशबिंदु - पृथुश्रवस् - अंतर - सुयज्ञ - उशनस् - शिनेयु - मरुत - कंबलबर्हिस् (?) - रुक्मकवच - परावृष्ट - जयमध - विदर्भ - क्रय - कुंती - धाष्टी - निवृत्ति - दशाई - व्योम - जीमूत - विकृति - भीमरथ - रथवर - नवरथ - दशरथ - एकादशरथ - शकुनी - कुरंभी - देवरत - देवक्षेत्र - देवन् - मधु - पुरूवश - पुरूहोत्र - अंशु - सत्त्वत् - भीम - भजमान - चित्ररथ - विदुरथ - शूर - शर्मन् - प्रतिक्षात्र - स्वयंभोज - हृदिक - देवभिथुश (?) - शूर (२) - वसुदेव - (कृष्ण)

श्रीकृष्णाचे वंशज

[संपादन]

(कृष्ण) - प्रद्युम्न - अनिरुद्ध - वज्रनाभ - प्रतिबाहु - सुबाहु - शांतसेन - सत्यसेन - श्रुतसेन - गोविंदभद्र - सूर्यभद्र - शांतिवाहन - सद्विजय - विश्वराह - क्षेमराह/खेंगार - हरिराज - सोम. जाधव माधव