Location via proxy:   [ UP ]  
[Report a bug]   [Manage cookies]                
Jump to content

लोकमान्य टिळक टर्मिनस

Coordinates: 19°4′12″N 72°53′24″E / 19.07000°N 72.89000°E / 19.07000; 72.89000
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लोकमान्य टिळक टर्मिनस
नवीन इमारत

लोकमान्य टिळक टर्मिनस हे भारताच्या मुंबई शहरामधील एक मोठे रेल्वे टर्मिनस आहे. कुर्ला उपनगरामधील हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वे हार्बर मार्गावरील कुर्लाटिळक नगर ह्या स्थानकांच्या जवळ आहे. ७ फलाट असलेल्या ह्या स्थानकामधून दररोज अनेक गाड्या सुटतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ह्या मध्य रेल्वेवरील प्रमुख स्थानकावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी हे स्थानक बांधले गेले. लोकमान्य टिळक टर्मिनस भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागाच्या अखत्यारित येते. ह्या स्थानकामधून मुख्यत: उत्तर भारतामधील स्थानांकडे जाणाऱ्या गाड्या सुटतात.

रोज सुटणाऱ्या गाड्या

[संपादन]
गाडी नाव गंतव्यस्थान
लोकमान्य टिळक टर्मिनस − कोइंबतूर एक्सप्रेस कोइंबतूर
कुशीनगर एक्सप्रेस गोरखपूर
कामायनी एक्सप्रेस वाराणसी
पाटणा एक्सप्रेस पाटणा
वाराणसी जलद एक्सप्रेस वाराणसी
गोरखपूर जलद एक्सप्रेस गोरखपूर
मत्स्यगंधा एक्सप्रेस मंगळूर
काशी एक्सप्रेस गोरखपूर
नेत्रावती एक्सप्रेस तिरुवनंतपुरम
हुबळी एक्सप्रेस हुबळी
लोकमान्य टिळक टर्मिनस कोलकाता शालिमार एक्सप्रेस शालिमार
लोकमान्य टिळक टर्मिनस विशाखापट्टणम एक्सप्रेस विशाखापट्टणम

बाह्य दुवे

[संपादन]

19°4′12″N 72°53′24″E / 19.07000°N 72.89000°E / 19.07000; 72.89000