Location via proxy:   [ UP ]  
[Report a bug]   [Manage cookies]                
Jump to content

आगगाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.

आगगाडी हे लोखंडी रुळांवरून चालणारे आणि वाहतुकीसाठी वापरले जाणारे एक वाहन आहे. एकापाठीमागे एक अश्या पद्धतीने अनेक डबे जुंपलेल्या व रुळांवरून धावत माल व प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत वाहून नेणाऱ्या वाहनाला आगगाडी म्हणतात. हे रूळ बहुधा पोलादी असतात व काटकोनात बसवलेल्या लाकडी, कॉंक्रीट किंवा लोखंडी पट्टयांना जखडलेले असतात. या पट्टया जमिनीवर असतात.

पूर्वी रेल्वेगाड्या कोळशाच्या इंधनावर चालत. कोळसा जाळून त्यातून मिळणाऱ्या ऊर्जेवर रेल्वेगाडीचा पुढील डबा(इंजिन) इतर डब्यांना ओढू शके. या प्रक्रियेत धूर निर्माण होत असे व त्यामुळे या वाहनाला आगगाडी असे म्हणू लागले. आज बहुतेक रेल्वेगाड्या डिझेल, पेट्रोलवीज इत्यादी इंधनावर चालतात, तरीपण त्यांना आगगाडीच म्हणतात.

आगगाडीचा शोध

ब्रिटिश इंजिनियर जॉर्ज स्टीफन्सन (१७८१ - १८४८)यांनी रेल्वेचा शोध लावला. १८१४ मध्ये स्टीफन्सन यांनी बनवलेली आगगाडी रुळावरून धावू लागली. ती आगगाडी वाफेच्या इंजिनवर चालणारी होती, त्या इंजिनाचं नाव 'ब्लूचर' असं होतं. त्यानंतर त्यांनी गाडी ओढणारं इंजिन बनवलं त्याचं नाव होतं 'लोकोमोटिव्ह', १९२९ मद्धे त्यांचा मुलगा रॉबर्ट याच्या मदतीने, 'रॉकेट' नावाचं वाफेवर चालणारं व डबे ओढणारं इंजिन तयार केलं, हेच इंजिन लिव्हरपूल ते मॅंचेस्टर या जगातल्या पहिल्या रेल्वेमार्गावर पॅसेंजर गाडी चालवण्यासाठी निवडलं गेलं.रेल्वे साहित्यामधूनच जनसंपर्क हा हा शब्द उदयास आले.


हे सुद्धा पहा

चित्रदालन