रताळे
Appearance
रताळे ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याचा कंद जास्त उपयोगात येतो. यात पांढरा व लाल असे दोन प्रकार आहेत.लाल रताळे जास्त गोड असते व गुणांनी जास्त चांगले असते. उपवासाचे दिवशी याचा खाद्य म्हणून वापर अनेक ठिकाणी होतो.तसेच हे गरीबांचेही खाद्य आहे.हे पचनास हलके आहे.
रताळ्यात पंधरा प्रकारची पोषकद्रव्ये असतात.
- त्यात नैसर्गिक साखर असते. ती मधुमेही रुग्णांसाठी फारच उपयुक्त असते. जी शरीरात योग्य प्रकारे शोषल्या जाते. याने इन्सुलीनचा स्तर वाढतो.
- त्यात उच्च प्रकारचे तंतू (फायबर) असतात त्याने बद्धकोष्ठ व कोलोन कॅंसरला प्रतिबंध होतो.
- त्यातील द्रव्यांनी व्हिटॅमिन ए उत्पादित होते ते शरीरासाठी चांगले असते. ज्यांना श्वासासंबंधी त्रास आहे त्यांना हे फायदेशीर असते.विशेषतः जे धूम्रपान करतात त्यांनी रताळे खायलाच हवे.
- त्यात व्हिटॅमिन डी असते [ संदर्भ हवा ] जे दात हृदय हाडे व ज्यांना थॉयराईडची समस्या असेल यांच्यासाठी चांगले असते.
- त्यात भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते जे उच्च रक्तदाबासाठी चांगले असते.ते शरीरातील सोडियमची मात्रा नियंत्रित करते व पर्यायानी रक्तदाबही नियंत्रित होतो.पोटॅशियम हे टिश्यूज व स्नायूंसाठी चांगले असते.ते शरीरातील पाणी धारण क्षमतेसाठी चांगले असते.
- यातील व्हिटॅमिन बी६ हे स्नायूतंत्र व हृदयासाठी चांगले असते. ते मेंदूला पाठविण्यात येणारे संदेश दुरुस्त करते.हृदयाची स्पंदनेपण नियंत्रित करते.
- त्यात बीटा कॅरोटिन असते जे उच्च प्रकारचे अॲंटीऑक्सिडंटस् तयार करते.ज्याने ब्रेस्ट व लंगचा कर्करोगास प्रतिबंध होतो.त्याने वयस्कपणा (एजिंग ईफेक्ट) दूर होतो.बीटा कॅरोटिन केसांच्या वाढीसाठीही चांगले असते
- त्यात फॉलिक अॲसिड असते.ते शरीर विकासास सहाय्य करते. गर्भवती महिलांनी याचे सेवन करावयासच हवे.
- त्यातील मॅग्नेशियम तणाव दूर करण्यास मदत करते.
- व्हिटॅमिन सी संपूर्ण शरीरासाठी उत्तम असते व यात ते भरपूर असते.
- यात लोहही भरपूर असते ज्याने शरीरातील लाल व सफेद रक्तपेशींवर त्याचा चांगला प्रभाव पडतो.ते ॲनिमियासाठीही उत्तम असते.
- रताळे उकळलेले पाणी त्वचेसाठी चांगले असते. त्याने जळजळ व खाज नाहीशी होते.त्याने त्वचा उजळते.
- त्यात असलेले व्हिटॅमिन ई हे डोळ्याभोवतीची काळी वर्तुळे व त्वचेच्या वळ्या नाहीशा करते.
- ते मासिक पाळीचा त्रास दूर करते.
- त्यात प्रोटिन कार्बोहायड्रेट व एन्झाईम असतात. त्याने शरीराला योग्य पोषणमूल्य मिळते.
महत्त्वाचे: ज्याला कधीही ऑक्झिलेटने झालेल्या मूतखड्याचा त्रास झाला आहे त्याने ते खाण्यापूर्वी तज्नांचा सल्ला घ्यावा.
संदर्भ:यूट्यूववरची माहिती स्वीटपोटॅटोज https://www.youtube.com/watch?v=31bwE0Y3hJM
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |