Location via proxy:   [ UP ]  
[Report a bug]   [Manage cookies]                
Jump to content

रताळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रताळे
रताळ्याचा कीस
रताळे बटाटापासून तयार केलेले मिठाई

रताळे ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याचा कंद जास्त उपयोगात येतो. यात पांढरा व लाल असे दोन प्रकार आहेत.लाल रताळे जास्त गोड असते व गुणांनी जास्त चांगले असते. उपवासाचे दिवशी याचा खाद्य म्हणून वापर अनेक ठिकाणी होतो.तसेच हे गरीबांचेही खाद्य आहे.हे पचनास हलके आहे.

रताळ्यात पंधरा प्रकारची पोषकद्रव्ये असतात.

  1. त्यात नैसर्गिक साखर असते. ती मधुमेही रुग्णांसाठी फारच उपयुक्त असते. जी शरीरात योग्य प्रकारे शोषल्या जाते. याने इन्सुलीनचा स्तर वाढतो.
  2. त्यात उच्च प्रकारचे तंतू (फायबर) असतात त्याने बद्धकोष्ठ व कोलोन कॅंसरला प्रतिबंध होतो.
  3. त्यातील द्रव्यांनी व्हिटॅमिन ए उत्पादित होते ते शरीरासाठी चांगले असते. ज्यांना श्वासासंबंधी त्रास आहे त्यांना हे फायदेशीर असते.विशेषतः जे धूम्रपान करतात त्यांनी रताळे खायलाच हवे.
  4. त्यात व्हिटॅमिन डी असते [ संदर्भ हवा ] जे दात हृदय हाडे व ज्यांना थॉयराईडची समस्या असेल यांच्यासाठी चांगले असते.
  5. त्यात भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते जे उच्च रक्तदाबासाठी चांगले असते.ते शरीरातील सोडियमची मात्रा नियंत्रित करते व पर्यायानी रक्तदाबही नियंत्रित होतो.पोटॅशियम हे टिश्यूज व स्नायूंसाठी चांगले असते.ते शरीरातील पाणी धारण क्षमतेसाठी चांगले असते.
  6. यातील व्हिटॅमिन बी६ हे स्नायूतंत्र व हृदयासाठी चांगले असते. ते मेंदूला पाठविण्यात येणारे संदेश दुरुस्त करते.हृदयाची स्पंदनेपण नियंत्रित करते.
  7. त्यात बीटा कॅरोटिन असते जे उच्च प्रकारचे अॲंटीऑक्सिडंटस् तयार करते.ज्याने ब्रेस्ट व लंगचा कर्करोगास प्रतिबंध होतो.त्याने वयस्कपणा (एजिंग ईफेक्ट) दूर होतो.बीटा कॅरोटिन केसांच्या वाढीसाठीही चांगले असते
  8. त्यात फॉलिक अॲसिड असते.ते शरीर विकासास सहाय्य करते. गर्भवती महिलांनी याचे सेवन करावयासच हवे.
  9. त्यातील मॅग्नेशियम तणाव दूर करण्यास मदत करते.
  10. व्हिटॅमिन सी संपूर्ण शरीरासाठी उत्तम असते व यात ते भरपूर असते.
  11. यात लोहही भरपूर असते ज्याने शरीरातील लाल व सफेद रक्तपेशींवर त्याचा चांगला प्रभाव पडतो.ते ॲनिमियासाठीही उत्तम असते.
  12. रताळे उकळलेले पाणी त्वचेसाठी चांगले असते. त्याने जळजळ व खाज नाहीशी होते.त्याने त्वचा उजळते.
  13. त्यात असलेले व्हिटॅमिन ई हे डोळ्याभोवतीची काळी वर्तुळे व त्वचेच्या वळ्या नाहीशा करते.
  14. ते मासिक पाळीचा त्रास दूर करते.
  15. त्यात प्रोटिन कार्बोहायड्रेट व एन्झाईम असतात. त्याने शरीराला योग्य पोषणमूल्य मिळते.

महत्त्वाचे: ज्याला कधीही ऑक्झिलेटने झालेल्या मूतखड्याचा त्रास झाला आहे त्याने ते खाण्यापूर्वी तज्नांचा सल्ला घ्यावा.


संदर्भ:यूट्यूववरची माहिती स्वीटपोटॅटोज https://www.youtube.com/watch?v=31bwE0Y3hJM