Location via proxy:   [ UP ]  
[Report a bug]   [Manage cookies]                
Jump to content

जिग्मे घेसर नामग्याल वांग्चुक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जिग्मे घेसर नामग्याल वांग्चुक
राजा
अधिकारारोहण १४ डिसेंबर, इ.स. २००६
राज्याभिषेक ६ नोव्हेंबर, इ.स. २००८
राजधानी थिंफू
पूर्ण नाव जिग्मे घेसर नामग्याल वांग्चुक
जन्म २१ फेब्रुवारी, इ.स. १९८०
देचेनचोलिंग राजवाडा, भूतान
पूर्वाधिकारी जिग्मे सिंग्ये वांग्चुक
वडील जिग्मे सिंग्ये वांग्चुक
आई छेरिंग यांग्दोन
पत्नी जेत्सुन पेमा
राजघराणे वांग्चुक राजघराणे
चलन भूतानी न्गुलत्रुम
धर्म बौद्ध धर्म


जिग्मे घेसर नामग्याल वांग्चुक (मराठी लेखनभेद: जिग्मे खेसर नामग्याल वांग्चुक ; जोंखा: འཇིགས་མེད་གེ་སར་རྣམ་རྒྱལ་དབང་ཕྱུག་ ; रोमन लिपी: Jigme Khesar Namgyel Wangchuck) (२१ फेब्रुवारी, इ.स. १९८० - हयात) हा भूतानाचा ५वा व विद्यमान राजा आहे. १४ डिसेंबर, इ.स. २००६ रोजी हा राजा बनला व ६ नोव्हेंबर, इ.स. २००८ रोजी त्याला अधिकॄत रित्या राज्याभिषेक करण्यात आला. १३ ऑक्टोबर, इ.स. २०११ रोजी एकवीसवर्षीय जेत्सुन पेमा हिच्याशी याचा विवाह झाला.

भूतानाचा ४था राजा जिग्मे सिंग्ये वांग्चुक व त्याची तिसरी पत्नी छेरिंग यांग्दोन यांच्या पोटी घेसराचा जन्म झाला. त्याचे पदवीशिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठास अंकित असलेल्या मॅग्डालेन कॉलेजात झाले.

बाह्य दुवे

[संपादन]
  • "भूतान इ.स. २००८ : भूतानाच्या पाचव्या राजाच्या राज्यारोहण सोहळ्याचे अधिकृत संकेतस्थळ" (जोंखा व इंग्लिश भाषेत). 2008-03-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-10-15 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)