Location via proxy:   [ UP ]  
[Report a bug]   [Manage cookies]                
Jump to content

रशियन क्रांती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रशियन क्रांती (इ.स. १९१७)
पेत्रोग्राद येथील इ.स. १९१७ची सोव्हिएत सभा
पेत्रोग्राद येथील इ.स. १९१७ची सोव्हिएत सभा
दिनांक इ. स. १९१७
स्थान रशिया
परिणती
युद्धमान पक्ष
रशियन साम्राज्य रशियन हंगामी सरकार बोल्शेव्हिक
पेत्रोग्राद सोव्हिएत

क्रांतीपूर्व काळात रशियात रोमानोव्ह घराण्याची सत्ता होती. इ.स. १९१७ रशियात झालेल्या राजकीय उलथापालथीस रशियन क्रांती म्हणले जाते. यामुळे झारची निरंकुश सत्ता लयाला गेली. मार्च, इ.स. १९१७ मध्ये झारशाही लयाला गेली व त्या ठिकाणी हंगामी सरकार आले.हे हंगामी सरकार मेन्शॅव्हिक गटाचा नेता (समाजवादी क्रांतिकारी पक्ष तृदोविक गट) केरेन्स्की याच्या नेतृत्वखालचे होते. बोल्शॅव्हिक नेता व्लादिमीर लेनिन याने केरेन्स्कीचे हंगामी सरकार बरखास्त केले.ऑक्टोबरमधील दुसऱ्या क्रांतीत हंगामी सरकारची सत्ता बोल्शेव्हिक (साम्यवादी) सरकारच्या हाती गेली.बोल्शॅव्हिक नेता व्लादिमीर लेनिन याने केरेन्स्कीचे हंगामी सरकार बरखास्त केले.

रशियन राज्यक्रांती ही पहिली साम्यवादी क्रांती होती. जगभरातील कामगारांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यास ती कारणीभूत ठरली. आर्थिक नियोजनाच्या मार्गाने विकास साधण्याची संकल्पना ही या क्रांतीने जगाला दिलेली देणगी आहे. इ.स. १९१७ च्या फेब्रुवारी महिन्यात पेट्रोग्राड येथे कामगारांनी संप पुकारला. ही रशियन राज्यक्रांतीची नांदी ठरली. त्यानंतर राजधानीतील सैनिकांनीही कामगारांना पाठिंबा दिला. हे या राज्यक्रांतीचे पहिले पर्व होते. स्वित्झर्लंडमध्ये अज्ञातवासात असलेला बोल्शेव्हिक नेता लेनिन इ.स. १९१७ च्या एप्रिलमध्ये रशियात परतला, तेंव्हा या राज्यक्रांतीचे दुसरे पर्व सुरू झाले.

हे सुद्धा पहा

[संपादन]