Location via proxy:   [ UP ]  
[Report a bug]   [Manage cookies]                
Jump to content

दालन:इतिहास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


इतिहास

भूगोल
भूगोल

इतिहास ही भूतकाळातील घटनांविषयीची वस्तुनिष्ठ माहिती शोधणारी, तिचा पद्धतशीर अभ्यास करून तर्कसंगत मांडणी करणारी विद्याशाखा आहे.

इतिहास = इति +ह्+आस = हे असे घडले

इतिहासाची सर्वमान्य अशी व्याख्या नाही. प्रसिद्ध इतिहासकार ई.एच.कार यांच्या मते 'भूतकाळ व वर्तमानकाळ यांतील न संपणारा संवाद......

उपदालने

विशेष लेख

क्लिओपात्रा ७ फिलोपातोर (ग्रीक: Κλεοπάτρα Φιλοπάτωρ) (इ.स. पूर्व ६९ - १२ ऑगस्ट ३०) ही प्राचीन इजिप्तची राणी होती. क्लिओपात्रा जुलियस सीझर ह्या रोमन सम्राटाची अविवाहित पत्नी होती असे मानले जाते. १२ ऑगस्ट ३० रोजी वयाच्या ३९व्या वर्षी क्लिओपात्राने स्वतःवर सर्पदंश करून घेऊन आत्महत्या केली.

इ.स.पू. ६९ मध्ये जन्मलेली क्लिओपात्रा बाराव्या प्टॉलेमीची कन्या होती. या प्टॉलेमीचा पूर्वज पहिला प्टॉलेमी हा अलेक्झांडर द ग्रेट याच्या सैन्यात सेनानी होता. हा मॅसोडेनियन सेनानी अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर इजिप्तचा पहिला प्टॉलेमी राजा झाला. या राजघराण्याने भाऊ-बहिणींमधील लग्नाची पद्धत वंशशुद्धीच्या कल्पनेने उचलली होती. क्लिओपात्राच्या जन्माच्या वेळी इजिप्त हे अतिशय श्रीमंत राज्य होते. परंतु हे राज्य राजकीयदृष्ट्या अस्थिर असल्यामुळे व शेजारच्या रोमन साम्राज्यापुढे आपला टिकाव लागणार नाही म्हणून क्लिओपात्राच्या बापाने करार करून सीझर आणि पॉंपेईकडून आपला इजिप्तवर राजा म्हणून असलेला अधिकार मान्य करून घेतला होता. याबदल्यात रोमनांनी प्टॉलेमीकडून प्रचंड रक्कम घेतली. ही रक्कम प्टॉलेमीने रोमन धनकोंकडून कर्जाऊ घेऊन दिली. या प्रचंड रकमेची परतफेड करणे अवघड होते त्यामुळे त्याच्या राज्यातील नागरीकांना त्याचे हे कृत्य पसंत नसल्याने राज्यात अंतर्गत बंडाळी माजली. या परिस्थितीतच इ.स.पू. ५१ मध्ये प्टॉलेमीचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याची १८ वर्षीय कन्या क्लिओपात्रा आणि तिचा धाकटा १० वर्षाचा भाऊ तेरावा प्टॉलेमी संयुक्तपणे राज्यावर आले. या राजघराण्यातील परंपरेनुसार हा तिचा धाकटा भाऊ तेरावा प्टॉलेमी क्लिओपात्राचा नवरा होता. तो आपल्याच हाताखालील एका सेवकाच्या आहारी जाऊन त्याच्या हातातील बाहुले बनला होता. क्लिओपात्राला दूर करून राज्य हातात घेण्याच्या त्यांच्या योजना चालू होत्या. रोममध्येही त्याचवेळी सीझर सत्तेवर आला होता. रोमची तिजोरी रिकामी होती त्यासाठी सीझरला इजिप्तकडून वसूली करणे गरजेचे होते म्हणून सीझर अलेक्झांड्रियाला आला. राज्यातील अंतर्गत बंडाळी आणि भावाची/नवऱ्याची कारस्थाने यातून मार्ग काढण्यासाठी क्लिओपात्राने सीझरची मदत घेतली. यानंतर क्लिओपात्राचे सीझरशी अत्यंत सलोख्याचे संबंध असले तरी रोमविषयी तिच्या मनात भीती होतीच. सीझरच्या खूनाच्या वेळी क्लिओपात्रा रोममध्येच होती. सीझरचे खूनी आणि त्याचे मित्रही या खूनासाठी क्लिओपात्राची मदत मागत होते. तिची सत्ता आणि राज्याचे स्वतंत्र असणे याचा विचार करून तिने त्यावेळी अॅंटोनीला मदत केली. नौका पुरविल्या. पैसा दिला. त्यामुळे साहजिकच क्लिओपात्रा आणि अॅंटोनी यांच्यातही सलोख्याचे संबंध निर्माण झाले.

इतिहासकार

लेओपोल्ड फॉन रांक (मराठी लेखनभेद: लेओपोल्ड फॉन रांके; जर्मन: Leopold von Ranke) (डिसेंबर २१, इ.स. १७९५; वीह, थ्युरिंगेन, जर्मनी - मे २३, इ.स. १८८६; बेर्लिन, जर्मनी) हा जर्मन इतिहासकार होता.

याचे शिक्षण हाले व बर्लिन येथे झाले. इ.स. १८१८ साली त्याने फ्रांकफुर्ट येथील एका शाळेत शिक्षकाची नोकरी स्विकारली. त्यानंतर इ.स. १८२५ साली रांकप्रशियन शासनाच्या सेवेत दाखल झाला. त्याचवेळी त्याची बर्लिन येथे इतिहासाचा प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. नेबूरचा रोमन इतिहास वाचल्यानंतर उत्सुकता व विश्वासार्ह माहिती मिळवण्यासाठी रांक याने हिरोडोटस, थुसिडाडस, झेनोफीन, डायनोसिस, लिव्ही, सिसिरो या इतिहासकारांचे साहित्य अभ्यासले.

इ.स.च्या १९व्या शतकातील शास्त्रशुद्ध इतिहास संशोधन व इतिहास लेखन याचा इतिहास प्रणेता आहे. त्याने इतिहासाला बुद्धिवादी विषय बनवून व्यावसायिक प्रशिक्षण व पुराभिलेख संशोधन कार्यपद्धतीची जोड दिली. शास्त्रोक्त संशोधन करून व पुराव्यांची काटेकोर छानणी करूनच त्यावर इतिहास लेखन करण्याचा नवा पायंडा त्याने पाडला.

इतिहासात आजचा दिवस

नवीन लेख

झेलमची लढाई (इंग्लिश: Battle of the Hydaspes, बॅटल ऑफ द हिडास्पेस) ही इ.स.पू. ३२६ साली अलेक्झांडर आणि पोरस यांच्यात झेलम नदीच्या काठी झालेली लढाई होती.

तक्षशीलेचा राजा अंभी आणि झेलम आणि चिनाब नद्यांदरम्यान राज्य करणारा पोरस उर्फ पौरव (पुरू) हे प्रबळ राजे असले तरी त्यांचे आपापसात अजिबात पटत नव्हते. त्यांच्यात सतत संघर्ष होत असत आणि ते एकमेकांना आपल्या राज्यविस्ताराच्या धोरणातील अडथळे मानत असत. अलेक्झांडर सिंधू नदी पार करून आल्यानंतर अंभी राजाने लगेच अलेक्झांडरच्या छावणीत जाऊन त्याची औपचारीक शरणागती पत्करली आणि त्याला चांदीचे २०० टॅलेंट, तीन हजार बैल, दहा हजार मेंढ्या, तीस हत्ती आणि इतर अनेक वस्तूंचा नजराणा दिला. पोरस आपल्या राज्याच्या सीमा पूर्वेकडे वाढवून त्या प्रदेशात आपले वर्चस्व स्थापन करण्याच्या प्रयत्नात असल्याने अंभीने पोरसाचा पराभव करण्यासाठी अलेक्झांडराशी सख्य करून त्याची मदत स्विकारली. नंतर अलेक्झांडराने एका दूताकरवी शरणागती पत्करण्याचा निरोप पोरसाकडे पाठवला पण पोरसाने त्याला दाद दिली नाही उलट राज्याच्या सीमेवर आपण सशस्त्र भेटण्यास तयार असल्याचा निरोप पोरसाने अलेक्झांडराला पाठवला.


पोरसाचा निरोप मिळाल्यानंतर अलेक्झांडराने वायव्य भारताच्या क्षत्रपपदी फिलिप याची नियुक्ती करून त्याचे मुख्यालय पुष्कलावती उर्फ पेशावर येथे केले. अंभीच्या तक्षशीला राज्यात सैन्याची एक तुकडीही तैनात केली आणि नंतर त्याने आपला मोर्चा पोरसाकडे वळवला. अंभीच्या सैन्यासह अलेक्झांडराचे ग्रीक सैन्य झेलम नदीपर्यंत पोहोचले. नदीला तेव्हा पूर आला होता तरीही ठरल्याप्रमाणे पोरस नदीच्या पलीकडील काठावर आपल्या सैन्यासह हजर होता. पोरसाने त्या परिसरातील पूंच आणि नौशेरा भागातील अभिसार जमातीच्या राजांचीही मदत घेण्याचा प्रयत्न केला होता पण त्याने आधीच अलेक्झांडरासमोर शरणागती पत्करली होती. रावी नदीच्या परिसरात राज्य करणाऱ्या पोरसाच्या एका आप्तानेही त्याला मदत करण्याचे नाकारले. अशा रितीने सर्व बाजूंनी कोंडी झाली असली तरी पोरसाने परिणामांची तमा न बाळगता खंबीरपणे अलेक्झांडराच्या सैन्याचा मुकाबला करण्याचा निश्चय केला.

निवडक चित्र

वर्ग

तुम्ही काय करू शकता

  • आपण इतिहास विषयातील रसिक, अभ्यासक, शिक्षक, लेखक अथवा वाचक असल्यास आपले येथे स्वागत आहे. इतिहासविषयक लेखांच्या विस्तारीकरणाचे व अन्य संबंधित कामांचे सहयोगी पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी विकिपीडिया:विकिप्रकल्प इतिहास हा विकिप्रकल्प चालवला जात आहे. या विकिप्रकल्पात सहभागी होऊन आपण अन्य उत्सुक सदस्यांच्या साथीने नवीन लेख तयार करू शकता, तसेच विस्ताराच्या प्रतीक्षेत असलेल्या लेखांमध्ये भर घालू शकता.