Location via proxy:   [ UP ]  
[Report a bug]   [Manage cookies]                
Skip to main content
Some of Albert Camus's essays were published in various periodicals between 1936 and 1939. They were later published in book form. The essay 'L'été à Alger' is one of them. Memories of Algeria, where Camus was born, were etched in his... more
Some of Albert Camus's essays were published in various periodicals between 1936 and 1939. They were later published in book form. The essay 'L'été à Alger' is one of them. Memories of Algeria, where Camus was born, were etched in his mind. In this essay, he reveals his close relationship with his motherland by reviving the sights, sounds and smells of that land. The nature and people of Algeria have a great influence on Camus' philosophical position and his literature. This essay is a poetic reflection on what happiness is, and how it can be found in the simple things of everyday life. This is an abridged version of the original essay translated from the French into Marathi.
Neorealism was a film movement born in Italy in the aftermath of WWII. André Bazin admired Neorealism for ‘the priority given to the representation of reality over dramatic structures.’ Neorealism was also adapted as a stylistic choice by... more
Neorealism was a film movement born in Italy in the aftermath of WWII. André Bazin admired Neorealism for ‘the priority given to the representation of reality over dramatic structures.’ Neorealism was also adapted as a stylistic choice by many filmmakers across the world. Cinema in Maharashtra has always been under threat from the big-budget Hindi film industry situated in Mumbai. The 1980s and 1990s were a period of identity crisis for Marathi cinema. The early 2000s, however, saw a resurgence in the industry. This was in no small part thanks to ideas borrowed from Neorealism. How and why would a cinema movement from almost sixty years ago influence Marathi cinema in a post-globalization Maharashtra, where contemporary world cinema was slowly becoming available through various means, official or unofficial?
फ्रान्स्वा त्रूफो दिग्दर्शित 'फोर हंड्रेड ब्लोज' (१९५९), 'ज्यूल अँड जिम' (१९६१) यांसारख्या फ्रेंच न्यू वेव्हच्या जाणिवा घडवणाऱ्या चित्रपटांना यश मिळालं. समीक्षकांनीही ते नावाजले. पण १९६४मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सॉफ्ट स्किन' या त्रूफोच्या... more
फ्रान्स्वा त्रूफो दिग्दर्शित 'फोर हंड्रेड ब्लोज' (१९५९), 'ज्यूल अँड जिम' (१९६१) यांसारख्या फ्रेंच न्यू वेव्हच्या जाणिवा घडवणाऱ्या चित्रपटांना यश मिळालं. समीक्षकांनीही ते नावाजले. पण १९६४मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सॉफ्ट स्किन' या त्रूफोच्या चित्रपटानं त्याच्या न्यू वेव्हमधल्या मित्रांना आणि चाहत्यांना नाराज केलं. खरं तर त्यात एक प्रौढ, सखोल मांडणी आहे आणि एका प्रदीर्घ तसंच वजनदार कारकिर्दीची चुणूकही आहे.
१९५९ हे वर्ष सिनेमाच्या इतिहासात क्रांतिकारक ठरलं. या क्रांतीचा उगम फ्रान्समध्ये झाला. या काळात बनलेल्या फ्रेंच चित्रपटांनी सिनेमाला नवीन भाषा दिली; जुने नियम मोडले आणि नवीन पायंडे पाडले. चित्रपटाच्या इतिहासातला हा महत्त्वाचा टप्पा... more
१९५९ हे वर्ष सिनेमाच्या इतिहासात क्रांतिकारक ठरलं. या क्रांतीचा उगम फ्रान्समध्ये झाला. या काळात बनलेल्या फ्रेंच चित्रपटांनी सिनेमाला नवीन भाषा दिली; जुने नियम मोडले आणि नवीन पायंडे पाडले. चित्रपटाच्या इतिहासातला हा महत्त्वाचा टप्पा `फ्रेंच न्यू वेव्ह' या नावानं ओळखला जातो. `न्यू वेव्ह'बद्दल गोदारच्या शब्दांत सांगायचं झालं तर `न्यू वेव्हनं कथा आणि वास्तव यांच्यात नवं नातं निर्माण केलं.' याच उक्तीचा अनुभव देणाऱ्या आलँ रेनेच्या `हिरोशिमा माय लव्ह' या १९५९मध्येच आलेल्या आणखी एका महत्त्वाच्या चित्रपटाची या लेखात ओळख करून दिली आहे.
`फ्रेंच न्यू वेव्ह'चं जागतिक चित्रपटाच्या इतिहासातलं स्थान आणि योगदान काय, असा प्रश्न विचारला तर असं लक्षात येतं की, `न्यू वेव्ह'मधल्या दिग्गजांचे चित्रपट ज्यांनी कधीही पाहिले नसतील, अशा जगभरातल्या अनेकांपर्यंत त्यांच्या कळत-नकळत `न्यू... more
`फ्रेंच न्यू वेव्ह'चं जागतिक चित्रपटाच्या इतिहासातलं स्थान आणि योगदान काय, असा प्रश्न विचारला तर असं लक्षात येतं की, `न्यू वेव्ह'मधल्या दिग्गजांचे चित्रपट ज्यांनी कधीही पाहिले नसतील, अशा जगभरातल्या अनेकांपर्यंत त्यांच्या कळत-नकळत `न्यू वेव्ह'च्या जाणिवा पोहोचल्या आहेत. आजचा भारतीय चित्रपट-रसिक निव्वळ भारतीय चित्रपट पाहूनही `न्यू वेव्ह'शी काही प्रमाणात नातं जोडू शकतो. अशा सहज झिरपत आपल्यापर्यंत आलेल्या `न्यू वेव्ह'च्या काही वैशिष्टयांची ओळख या लेखात करून दिली आहे. त्यासाठी काही भारतीय चित्रपटांचेच संदर्भ घेतले आहेत.
फ्रेंच माणूस आणि फ्रेंच संस्कृती यांविषयी अनेक समज-गैरसमज प्रचलित आहेत. त्यांत कधी फ्रेंचांचं अति-उदात्तीकरण असतं, तर कधी त्यांच्यावर नको इतकी टीकाही असते. खरे फ्रेंच आतून-बाहेरून कसे असतात याचा अंदाज येण्यासाठी जाक तातीचे चित्रपट पाहणं... more
फ्रेंच माणूस आणि फ्रेंच संस्कृती यांविषयी अनेक समज-गैरसमज प्रचलित आहेत. त्यांत कधी फ्रेंचांचं अति-उदात्तीकरण असतं, तर कधी त्यांच्यावर नको इतकी टीकाही असते. खरे फ्रेंच आतून-बाहेरून कसे असतात याचा अंदाज येण्यासाठी जाक तातीचे चित्रपट पाहणं अत्यावश्यक आहे. या दिग्दर्शकानं आपल्या कारकीर्दीत फारच थोडे चित्रपट बनवले. पूर्ण लांबीचे सहा चित्रपट आणि काही लघुचित्रपट एवढया बळावर त्याला कान आणि व्हेनिस महोत्सवांपासून ऑस्करपर्यंत अनेक पारितोषिकं मिळाली. १९५८ मध्ये प्रदर्शित झालेल्या `माय अंकल' (Mon Oncle) या तातीच्या चित्रपटाला कान महोत्सवात विशेष ज्यूरी पारितोषिक, न्यूयॉर्क फिल्म क्रिटिक्स पारितोषिक आणि सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटासाठी ऑस्कर अशी बक्षिसं मिळाली. त्याच चित्रपटाचा या लेखात परिचय करून दिला आहे.
“Love and work…work and love, that's all there is…love and work are the cornerstones of our humanness.” - Sigmund Freud. माणसाच्या हजारो वर्षांच्या इतिहासात श्रमसंस्कृतीमध्ये फार मोठे बदल घडले, पण माणूस जे काम करतो त्याचं त्याच्या... more
“Love and work…work and love, that's all there is…love and work are the cornerstones of our humanness.” - Sigmund Freud.
माणसाच्या हजारो वर्षांच्या इतिहासात श्रमसंस्कृतीमध्ये फार मोठे बदल घडले, पण माणूस जे काम करतो त्याचं त्याच्या आयुष्यातलं महत्त्व कमी झालं नाही, कारण फ्रॉइड म्हणतो त्याप्रमाणे तो आपल्या माणूस असण्याचाच एक महत्त्वाचा भाग आहे. भूतकाळात माणूस आणि श्रम ह्यांच्या परस्परसंबंधांत जी उत्क्रांती किंवा जे क्रांतिकारी बदल होत गेले त्यांचा आढावा घेतला, तर औद्योगिकीकरणाच्या आताच्या टप्प्यावर भविष्याचा वेध घेताना येऊ घातलेल्या काळाला कोणती दिशा देण्याचा प्रयत्न करणं आपल्या दीर्घकालीन हिताचं ठरेल ह्याचा कदाचित अंदाज येऊ शकेल. जागतिकीकरण, औद्योगिकीकरण, भांडवलवाद, उदारमतवाद, लोकशाही असे शब्द आज अतिशय सैलपणे आणि त्यांचा इतिहास जाणून न घेता वापरले जातात. परंतु श्रमसंस्कृतीवर ह्या संकल्पनांमुळे जो परिणाम झाला त्याचा संबंध माणसाच्या सुखाच्या कल्पनेशी लावता येतो का, आणि तसा प्रयत्न केला तर भविष्याविषयी काही वेगळा बोध होऊ शकेल का?
An article in Marathi about the French New Wave - how it came about and what its novelty was. Previously published in Roopwani, a journal about cinema by the Prabhat Film Society, Mumbai.
A Marathi article about the 1958 French film Ascenseur pour l'échafaud, directed by Louis Malle. Previously published in Roopwani, a journal about Cinema by the Prabhat Film Society, Mumbai.
A Marathi article about the 1955 French film Les Diaboliques, directed by
Henri-Georges Clouzot. Previously published in Roopwani, a journal about Cinema by the Prabhat Film Society, Mumbai.
An evaluation (in Marathi) of the classic from French Cinema Les Enfants du paradis, directed by Marcel Carné and written by the poet Jacques Prévert. The film is considered a chef-d'œuvre of French Poetic Realism.
My article in Marathi on the seminal French film Rules of the Game (1939) by Jean Renoir
The French government's policy about book trade in France became one of the contentious issues in the 2012 presidential elections. A short introduction to the issues involved.
Research Interests:
When the first novel of a young Bhalchandra Nemade was published in 1963, it caused a sensation in Marathi literary circles. This essay examines Kosala's literary merit, its claim to greatness and how the passage of time has treated the... more
When the first novel of a young Bhalchandra Nemade was published in 1963, it caused a sensation in Marathi literary circles. This essay examines Kosala's literary merit, its claim to greatness and how the passage of time has treated the novel.
१९५१ साली काम्यूचा 'The Rebel' हा दीर्घनिबंध प्रकाशित झाला. त्यात काम्यूनं बंडखोरीविषयी आधिभौतिक आणि सामाजिक पातळीवर विवेचन केलं आहे आणि त्याद्वारे मानवाच्या बंडखोरीचं एक ऐतिहासिक चित्र उभं केलं आहे. 'बंडखोरी आणि कला' ह्या त्यातल्या... more
१९५१ साली काम्यूचा 'The Rebel' हा दीर्घनिबंध प्रकाशित झाला. त्यात काम्यूनं बंडखोरीविषयी आधिभौतिक आणि सामाजिक पातळीवर विवेचन केलं आहे आणि त्याद्वारे मानवाच्या बंडखोरीचं एक ऐतिहासिक चित्र उभं केलं आहे. 'बंडखोरी आणि कला' ह्या त्यातल्या उपविभागाचा हा सारांश आहे. तो करताना मूळ फ्रेंच निबंधाचा आधार घेतला आहे.
एखाद्या देशातल्या पुस्तकविश्वात जे घडतं आहे त्याचे पडसाद राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवर पडू शकतील का? फ्रान्सच्या पुस्तकविश्वात खळबळ माजवणारी एक घटना नुकतीच घडली आणि नुकत्याच झालेल्या राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीमध्ये तिला थोडं... more
एखाद्या देशातल्या पुस्तकविश्वात जे घडतं आहे त्याचे पडसाद राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवर पडू शकतील का? फ्रान्सच्या पुस्तकविश्वात खळबळ माजवणारी एक घटना नुकतीच घडली आणि नुकत्याच झालेल्या राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीमध्ये तिला थोडं महत्त्वसुद्धा मिळालं. अमेरिका आणि इंग्लंडसारख्या देशांत पुस्तकांची छोटी दुकानं बंद पडण्याचं प्रमाण गेल्या काही वर्षांत खूप वाढलं आहे. अनेक बड्या साखळी दुकानांनासुद्धा (चेन स्टोअर्स) हा व्यवसाय परवडेनासा झाला आणि त्यांचं दिवाळं निघालं. यात भर म्हणून आता इ-पुस्तकं आली आहेत. फ्रान्समध्ये मात्र आजही पुस्तकांची तब्बल ३००० छोटी दुकानं आहेत (शिवाय मोठी साखळी दुकानं वेगळीच) आणि नवीन दुकानंही निघत आहेत. अ‍ॅमेझॉनसारख्या बड्या कंपन्यांच्या ताब्यात चाललेल्या इंग्लंड-अमेरिकेतल्या पुस्तक व्यवसायाला जणू ती वाकुल्या दाखवत आहेत. फ्रान्समधलं आजचं वास्तव इतर देशांहून कसं आणि का वेगळं आहे याचा थोडक्यात आढावा या लेखात घेतला आहे.
मेंदूविज्ञान आणि मानसशास्त्र या ज्ञानशाखांमध्ये उपलब्ध ज्ञानाचा उपयोग करून मानवी अस्तित्वविषयक प्रश्नांना उत्तरे शोधण्याचा प्रयत्न पॉल थॅगार्ड यांनी ‘The Brain and the Meaning of Life’ या पुस्तकात केला आहे. प्रस्तुत लेखात त्याचा परिचय... more
मेंदूविज्ञान आणि मानसशास्त्र या ज्ञानशाखांमध्ये उपलब्ध ज्ञानाचा उपयोग करून मानवी अस्तित्वविषयक प्रश्नांना उत्तरे शोधण्याचा प्रयत्न पॉल थॅगार्ड यांनी ‘The Brain and the Meaning of Life’ या पुस्तकात केला आहे. प्रस्तुत लेखात त्याचा परिचय करून दिलेला आहे.
‘परंपरा’ या शब्दाला आपल्याकडे खूप वजनदार संदर्भ असतात. ‘महान’, ‘समृद्ध’ अशी जी विशेषणं अनेकदा त्याला जोडून येतात, त्यांच्यामुळे हे वजन वाढत जातं आणि अखेर परंपरेचं जोखड बनतंय की काय, असं वाटू लागतं. अनेकविध परंपरांच्या सरमिसळीतून घडलेल्या... more
‘परंपरा’ या शब्दाला आपल्याकडे खूप वजनदार संदर्भ असतात. ‘महान’, ‘समृद्ध’ अशी जी विशेषणं अनेकदा त्याला जोडून येतात, त्यांच्यामुळे हे वजन वाढत जातं आणि अखेर परंपरेचं जोखड बनतंय की काय, असं वाटू लागतं. अनेकविध परंपरांच्या सरमिसळीतून घडलेल्या आपल्या संस्कृतीच्या इतिहासात ज्या परंपरांचं असं ओझं होणार नाही अशा काही खोडकर परंपरा कदाचित असतीलही; पण त्यांची आठवण करून दिली तर ‘त्या फार महत्त्वाच्या नव्हत्या’, किंबहुना ‘त्या नव्हत्याच’ असं म्हणून त्यांना नाकारण्याची प्रवृत्ती (किंवा परंपरा) आपल्याकडच्या परंपरांचे पाईक म्हणवणाऱ्यांमध्ये दिसून येईल. आपल्याहून काहीशा अंतरावर असणाऱ्या पाश्चिमात्य संस्कृतीतल्या जरा गमतीदार परंपरा शोधल्या, तर ‘ते’ लोक कसे तऱ्हेवाईक वगैरे असतात, असं म्हणून त्यांना मोडीत काढता येईल. मग अर्थात अशा विक्षिप्तपणाच्या तुलनेत ‘आपल्या’ परंपरांची महानताही आपोआप सिद्ध होईल. त्यामुळे आपल्या परंपरांच्या पाइकांना त्या पाश्चिमात्य परंपरांचं अस्तित्व नाकारण्याचे कष्टही घ्यावे लागणार नाहीत, अशा आशेनं अशा काही परंपरांचा आढावा घेण्याचा एक प्रयत्न या लेखात केलेला आहे.
मिसळपाव, उपक्रम, मायबोली, मनोगत, ऐलपैल, मी मराठी अशा नावांची संकेतस्थळं सध्या पुष्कळ लोकप्रिय आहेत. जगभरातले हजारो मराठीभाषक यांचे सदस्य आहेत. त्यांना विविध विषयांवर गद्य-पद्य लिखाण इथे करता येतं. मोठ्या सदस्यसंख्येमुळे आपोआप त्या... more
मिसळपाव, उपक्रम, मायबोली, मनोगत, ऐलपैल, मी मराठी अशा नावांची संकेतस्थळं सध्या पुष्कळ लोकप्रिय आहेत. जगभरातले हजारो मराठीभाषक यांचे सदस्य आहेत. त्यांना विविध विषयांवर गद्य-पद्य लिखाण इथे करता येतं. मोठ्या सदस्यसंख्येमुळे आपोआप त्या लिखाणाला मोठा वाचकवर्ग मिळतो. अनेक उत्साही सदस्यांच्या प्रतिक्रियांमुळे ही स्थळं गजबजलेली असतात. कोणत्याही संवादमाध्यमातून होणाऱ्या अभिव्यक्तीमधून त्या त्या समाजाचं काहीएक चित्र उभं राहत असतं. मराठी संवादस्थळांमधून मराठी समाजाचं जे चित्र उभं राहतं त्याचा आढावा या लेखात घेतलेला आहे.
२८ नोव्हेंबर २०१० रोजी जगभरातल्या अमेरिकी दूतावासांच्या अडीच लाख केबल्समधली गोपनीय माहिती प्रसारमाध्यमांतर्फे जगासमोर उघड होऊ लागली. अनेकांना `विकीलीक्स'च्या अस्तित्वाचा तेव्हा शोध लागला, पण विकीलीक्सचा सर्वेसर्वा असणाऱ्या ज्यूलिअन असांज... more
२८ नोव्हेंबर २०१० रोजी जगभरातल्या अमेरिकी दूतावासांच्या अडीच लाख केबल्समधली गोपनीय माहिती प्रसारमाध्यमांतर्फे जगासमोर उघड होऊ लागली. अनेकांना `विकीलीक्स'च्या अस्तित्वाचा तेव्हा शोध लागला, पण विकीलीक्सचा सर्वेसर्वा असणाऱ्या ज्यूलिअन असांज याने २००६पासून विकीलीक्समार्फत विविध प्रकारची गोपनीय माहिती उघड केलेली आहे. पाश्चिमात्य देशांनी, विशेषत: अमेरिकेने त्याची वेळोवेळी दखलही घेतलेली आहे. आताच्या परिस्थितीत पूर्वीपेक्षा एक फरक मात्र दिसतो आहे : असांजला गौप्यस्फोट करता येऊ नये यासाठी अनेकांनी आता कंबर कसलेली आहे. असांजला आणि त्याच्या विकीलीक्सला जगभरात मिळालेली प्रसिद्धी आणि त्यांना संपवण्याचे होणारे प्रयत्न, यांमुळे या सर्व प्रकाराविषयी विविध मते आणि विचार मांडण्याची अहमहमिका लागलेली आज सर्वत्र दिसते आहे. त्या गदारोळात न सापडता थोडे गंभीर मूल्यमापन करण्याचा प्रयत्न या लेखात केलेला आहे.

पूर्वप्रकाशन: 'आजचा सुधारक' मार्च २०११
A review of Salman Rushdie's Memoir 'Knife'
अस्तित्वाविषयीच्या गहन प्रश्नांची उत्तरे शोधणे मानवी संस्कृतीच्या इतिहासात नवे नाही. जगभरच्या संस्कृतींत तत्त्वज्ञ आणि धर्मज्ञ यांनी ती शोधण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. साहित्य, नाट्य अशा कलाप्रकारांद्वारेदेखील असे प्रयत्न झाले आणि आजही... more
अस्तित्वाविषयीच्या गहन प्रश्नांची उत्तरे शोधणे मानवी संस्कृतीच्या इतिहासात नवे नाही. जगभरच्या संस्कृतींत तत्त्वज्ञ आणि धर्मज्ञ यांनी ती शोधण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. साहित्य, नाट्य अशा कलाप्रकारांद्वारेदेखील असे प्रयत्न झाले आणि आजही होत आहेत. विवेकनिष्ठ विज्ञानपरंपरेतून अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याला मात्र एवढी दीर्घ परंपरा असल्याचे आढळत नाही. आपल्याला ज्ञात असलेले जग कसे अस्तित्वात आले याचा शोध वैज्ञानिक घेत आले आहेत; पण ते का अस्तित्वात आले असावे किंवा माणसाच्या जगण्याचे प्रयोजन काय, अशा प्रश्नांना विज्ञानाच्या कक्षेत आणण्याचे प्रयत्न तुलनेने नवे आहेत. मानवी मनाचा ठाव घेणाऱ्या मानसशास्त्रासारख्या विषयाला एक स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून स्थान मिळणे हीदेखील तुलनेने अलीकडची, म्हणजे गेल्या शे-दोनशे वर्षांतली घडामोड आहे. याच काळामध्ये वैज्ञानिक प्रगतीचा झपाटा वाढला आणि पूर्वी अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी विज्ञानामुळे शक्य झाल्या. वैज्ञानिक प्रगतीचा एक पैलू म्हणजे मेंदूविज्ञानाद्वारे मानवाच्या भावना आणि विचार यांच्याविषयीचे ज्ञान वाढले. तत्त्वज्ञ किंवा कलाकार हे मानवी स्वभाव किंवा प्रेरणा यांविषयी काही अंदाज बांधत असत; पण मेंदूविज्ञान आणि मानसशास्त्र या ज्ञानशाखांमधल्या संशोधनामुळे त्यांविषयी अधिक खात्रीलायक विधाने करता येऊ लागली. नव्याने उपलब्ध झालेल्या या ज्ञानाचा उपयोग करून मानवी अस्तित्वविषयक प्रश्नांना उत्तरे शोधता येतील का; प्रयोग-निरीक्षणे-निष्कर्ष अशा तर्कशुद्ध पद्धतींनी सिद्ध झालेल्या गोष्टींतून अस्तित्वविषयक प्रश्नांकडे पाहिले तर काय होईल; तत्त्वज्ञांनी आधीच जे मांडले आहे त्याला पुष्टी देता येईल का; की त्याहून काही वेगळे सापडेल, अशा विचारांनी प्रेरित होऊन पॉल थॅगार्ड यांनी ‘The Brain and the Meaning of Life’ हे पुस्तक लिहिले आहे. प्रस्तुत लेखात त्याचा थोडक्यात परिचय करून दिलेला आहे.
"Indignez-vous!" ("चिडून उठा!") नावाचं हे पुस्तक म्हणजे ४००० शब्दांचा एक निबंध आहे. आजच्या तरुणांना उद्देशून केलेलं हे निवेदन आहे. हे पुस्तक फ्रान्समध्ये आज लाखोंच्या संख्येनं खपतं आहे. अनेक परकीय भाषांतही त्याचे अनुवाद होत आहेत. असं काय... more
"Indignez-vous!" ("चिडून उठा!") नावाचं हे पुस्तक म्हणजे ४००० शब्दांचा एक निबंध आहे. आजच्या तरुणांना उद्देशून केलेलं हे निवेदन आहे. हे पुस्तक फ्रान्समध्ये आज लाखोंच्या संख्येनं खपतं आहे. अनेक परकीय भाषांतही त्याचे अनुवाद होत आहेत. असं काय या पुस्तकात आहे?
A review of Shyamchi Aai, a novel By Sane Guruji. 
Translated from the original Marathi by Shanta Gokhale. Introduction by Jerry Pinto.
Penguin/Puffin Classics, 2021, pp. 336, ₹299.00
भालचंद्र नेमाडे यांची 'हिंदू' ही महाकादंबरी २०१० साली प्रकाशित झाली. कादंबरीचं साहित्यमूल्य तपासून पाहत, कादंबरीचा आशय आणि त्याचा घाट यांचा परस्परसंबंध लक्षात घेत केलेलं हे कादंबरीचं विश्लेषण. पूर्वप्रकाशन : परिवर्तनाचा वाटसरू (जाने १-१५,... more
भालचंद्र नेमाडे यांची 'हिंदू' ही महाकादंबरी २०१० साली प्रकाशित झाली. कादंबरीचं साहित्यमूल्य तपासून पाहत, कादंबरीचा आशय आणि त्याचा घाट यांचा परस्परसंबंध लक्षात घेत केलेलं हे कादंबरीचं विश्लेषण. पूर्वप्रकाशन : परिवर्तनाचा वाटसरू (जाने १-१५, २०११)
An article in Marathi discussing the Norwegian writer Karl Ove Knausgård and his autobiographical novel 'My Struggle'.
Research Interests: